काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे साधारणपणे २.३० वाजले असतील. मी होम विजीट साठी जुन्या पेशंट कडे गेलो होतो. घरात जाऊन मौशार सोफ्यावर बसलो होतो. तेव्हाच एक हाक ऐकू आली. आज्जी, आजोबांचे फिजिओ आले बहुतेक. सांगायला त्यांचे वय ७८ वर्षे पण मानाने मात्र अगदी ८ वर्षे. अगदी टीपीकल middle क्लास घरतला एक वयोवृध्द माणूस. निवृत्त मास्तर शाळेतले. माझ्या वार्षिक चेकअप साठी मी आज तिथे गेलो होतो. एक वर्ष पूर्वी त्यांना एका आजाराने त्रस्त केल होत. शरीराची झीज झाली होती. कंबरेतून ते वाकले होते. चालताना तोल जात होता. कुठलीही हालचाल करायला खूप वेळ लागत होती. पाणी पिताना घास घेताना हात थरथरत होते. आधी डॉक्टरांनी त्यांना Parkinsonism झाला आहे असे सांगून त्यावर औषधे चालू केली. कुठली ही तपासणी न करता त्यांनी ती औषधे जवळ जवळ ६ महिने घेतली पण काही उपाय झाला नाही. त्यांनी डॉक्टर बदलला आणि त्या दुसर्या डॉक्टरांनी त्यांना surgery करावी लागेल. त्यांना Cervical Canal Stenosis झाला आहे हे investigate करून सांगितले. सर्जरी आधी आजोबा स्वतः उठून फिरू शकत होते. चालू शकत होते. पण बाकीची काम करण्यास त्रास होत होता. सर्जरी झाल्यावर आजोबांना फ़िजिओथेरपी घ्यावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. सर्जरी यशस्वी झाली. आणि आम्ही फ़िजिओथेरपीसुरु केली. त्यांची recovery ही फार छान चालली होती, पण अचानक त्यांनी सांगितलेले व्यायाम करणे बंद केले. आणि recovery थांबली. कोणाशीही बोलत नव्हते. खात पीत नव्हते. एकटेच आपल्या आराम खुर्ची वर बसून राहायचे. फ़िजिओथेरपीस्ट काळजीत पडले कि जी treatment आम्ही देत आहोत ती बरोबर आहे कि नाही. आमची पूर्ण team एकत्र आली ह्या मुद्द्यावर चर्चा करण्या साठी. आणि असे समजले कि त्यांना जी औषधे देत होते त्याचा दुष्परिणाम म्हणून त्यांना थकवा जाणवणे,काही करायची इच्चा न होणे अशी लक्षणे दिसत होती. त्यानंर एका दिवशी आमचे एक senior फ़िजिओथेरपीस्ट त्यांना सांगायला गेले कि आजोबांना Psychiatrist ची गरज आहे. पण त्या घरी जे चालले होते ते पाहून थक्क झाले. त्यांचा नातू त्यांच्याशी खेळत होता. एक साथ नमस्ते असा तो म्हणाला. समोर ठेवलेल्या खुर्ची वर उभा राहून स्वतःच स्वतःला म्हणाला... हम्म्म्म नमस्ते. बसा सगळ्यांनी. त्याचे आजोबा बाजूला खुर्चीवर निशब्द बसले होते. आमचे सर ते बघत होते. तो मुलगा शाळा शाळा खेळत होता बहुतेक आणि खुर्चीवर पुन्हा उभाराहून त्यानी प्रश्न विचारला. भारताची राजधानी कोणती. आणि खाली उतरून त्याला माहिती नाही असं त्या teacher ला सांगितला. परत तो खुर्ची वर उभा राहिला आणि ओरडला तुला इतका येत नाही. जा वर्गाच्या बाहेर जा. राहुल चे आजोबा तुम्हाला येत का याचे उत्तर ?? आजोबा निशब्द. काहीच बोलत नवते. मग राहुल त्याच्यावरच ओरडला तुझ्या आजोबांना ही येत नाही. असे कसे रे, राहुल बाहेर जातच होता आणि तेवढ्यात आजोबा ओरडले. अरे गाढध्या दिल्ली आहे त्याचे उत्तर. इतका ही माहिती नाही. मी तुला शिकवला होता न..... सगळीकडे शांतता पसरली होती. अचानक आजोबा आणि राहुल हसायला लागले. आमचे सर ते पाहून स्थब्द राहिले. आजोबा पुढे राहुल ला म्हणाले हे मास्तर चांगल शिकवत नाहीत चल मी तुला शिकवतो. आणि स्वतः उठून राहुल चा हात पकडून बाहेर आले. त्यांचा नातू हा २६ वर्षांचा मुलगा होता जो आपले आजोबा ठीक व्हावेत ह्यासाठी काही करायला तयार होता. आणि त्याने ते साध्य केल. त्या दिवसापासून आम्ही सर्वच चमत्कार होतात पण जादू ने नाहीत तर प्रेमाने ह्यावर विश्वास ठून काम करू लागलो. प्रत्येक पेशंट ला फक्त शरीरानेच नव्हे तर मानाने सुद्धा पारखू लागलो. आज मी पहिले तेव्हा ते आजोबा आपली Ambassador कार मधून खाली उतरले आणि म्हणाले ओह्ह्ह young man lets go for race. मी त्यांच्या शरीराची आणि स्नायूंची तपासणी करायला गेलो होतो. आणि त्यांनी मला कठीण असे शिर्सासन करून दाखवले आणि मलाही करायला सांगितले.
8m8 minutes agoSent
No comments:
Post a Comment