नमस्कार मित्र हो ,
आज मी आपल्याला फिजिओथेरपी म्हणजे नेमक काय याची थोड़ी माहिती देणार आहे. आजकलच्या आपल्या धावपळीच्या जीवनात आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. आपले जीवन हे विविध आजार, आणि विकारांनी त्रस्त आहे. अगदी दररोज ची गोष्ट आहे. काल आमच्या बाजूला राहणारी ८ वर्षांची अंजली म्हणाली डॉक्टर दादा माझी मान खुप दुखतेय, कही तरी कर न रे!
मी मनात विचार केला ८ वर्षाच्या मुलीला कसल आलय दुखण. न धडपडता ते पण. परंतु आज कालच्या राहणीमानामुळे हे सहज शक्य आहे. एक तर दप्तराचे भले मोठे वजन, ट्यूशन -शाळा -क्लासेस ह्या सगळ्यातून व्यायामला वेळ नाही, आणि उरलेला वेळ मैदानी खेळ सोडून मोबाइल आणि कंप्यूटर.आणि हे लाइफस्टाइल लहान मुलांप्रमाणे मोठ्यांनी ही आत्मसात केले आहे. ह्यातून गंभीर विकारांचा धोका उद्भवतो. जसे मान,पाय,कंबर इ. दुखणे आणि बरेच काही. सांगण्याचा मुद्दा असा की जर आपल्याला ह्या सगळ्यावर मात करायची असेल तार एकच खात्रीशीर उपाय म्हणजे "फिजियोथेरपी" !!!
आता फिजियोथेरपी म्हणजे नेमक काय तर आपल्या शारीरिक आणि मानसीक अस्वास्थ्याचे अचूक निदान करून त्यावर विना औषधे आणि सर्जरी केलेली थेरपी (इलाज/चिकित्सा). देवनागरी भाषेत त्याला भौतिक चिकित्सा असे म्हणतात.
फिजियोथेरपी आपल्या शरीरासाठी कशी उपयुक्त आहे हे मी पुढच्या ब्लॉग मधे सांगणार आहे. आज मी फिजियोथेरपीच्या शाखांबद्दल बद्दल माहिती देणार आहे. फिजियोथेरपी सर्व वयोगटातील लोकांसाठी त्यांच्या दुखाव्यावर आणि इतर शारीरिक व मानसिक तक्रारींवर इलाज व ते होउ नए ह्याची काळजी घेते। फिजियोथेरपी सर्व वयोगटातील लोकांना तन्दुरुस्त ठेवते। जीवन सहज,सोप्पे आणि सुदृढ़ जगण्यासाठी प्रोत्साहित करते.
फिजियोथेरपीच्या शाखा खलील प्रमाणे आहेत.
१. ऑर्थोपेडिक डिसऑर्डर्स साठी फिजियोथेरपी (हाड,सांधे,स्नायु,लिगमेंट,टेंडन संबंधी )
२. मेंदू संबंधी विकारांवर फिजियोथेरपी (पैरालेसिस, पार्किंसोनिसम,इ.)
३. हृदय संबंधी विकारांवर फिजियोथेरपी (बायपास सर्जरी आधी व् नंतर )
४. फुफुसांच्या संबंधी विकारांवर फिजियोथेरपी ( सी.ओ.पी.डी., अस्थमा)
५. खेळ संबंधी इंजुरी त्यावर इलाज आणि इंजुरी प्रिवेंशन साठी फिजियोथेरपी
६. महिलांच्या समस्या आणि संबंधी विकारांवर फिजियोथेरपी
७. वयोवृद्ध समाजातील सदसयांसाठी फिजियोथेरपी ( त्वचेवरच्या सूरकुत्या रोखण्यास उपयुक्त,तोल जाणे )
८. लहान मुलांच्या विकारां संबंधी फिजियोथेरपी ( सेरेब्रल पाल्सी,अटैक्सिया )
९. डायबिटीस आणि संबंधी रोगांवर फिजियोथेरपी
१०. हाय ब्लड प्रेशर (उच्च रक्त दाब) संबधी फिजियोथेरपी
११. कॅन्सर संबंधी विकारांवर फिजियोथेरपी
१२. जनरल फिटनेस संबंधी फिजियोथेरपी ( आजार किवा विकार होउ नए म्हणून प्रिवेंटिव फिजियोथेरपी )
१३. अर्गोनॉमिक्स ( आपण जे काम करता त्यामुळे होणार विकार) त्यावर फिजियोथेरपी। (कंप्यूटरवर काम करणारे मानदुखी ची तक्रार हमखास करतात इ., ती मानदुखी होउ नए ह्यसंबंधी फिजियोथेरपी)
तर अश्या फिजियोथेरपीच्या शाखा आहेत. फिजियोथेरपी तुम्ही कधी आणि कशी घेऊ शकता व
आपणा सर्वांना फिजियोथेरपी बद्दल अधिकाधिक माहिती मिळावी ह्यासाठी मी दर आठवड्याला फिजियोथेरपी विषयी माहिती देणार आहे. आपल्या मित्रपरिवारात,कुटुंबियात, आणि समाजात फिजियोथेरपी बद्दल जागरूकता निर्माण व्हावी हीच ह्या ब्लॉग मागची इच्छा आहे. आपल्या समाजाला,देशाला स्वस्थ आणि सुदृढ़ बनवण्यास मदत करा.
Let's take a step to make our community,family and our nation healthier
डॉ. ओंकार प्र.पाध्ये (पी.टी.) एम्.पी.टी.-एम्.एस.एस., डी.एच.वाय.पी.एन., एम्.आय.ए.पी.
मास्टर ऑफ़ फिजियोथेरपी (ओर्थपेडीक आणि स्पोर्ट्स डिसॉर्डर्स स्पेशलिस्ट )
फाउंडर क्वालिटी हेल्थ फिजियोथेरपी क्लिनिक
को-फाउंडर क्वालिटी हेल्थ मेडिकल सेंटर
मोब : +९१-९९८७१३४८८७
इ मेल - padhye_omkar@rediffmail.com , omkarphysio@gmail.com
क्लिनिक पत्ता : ३, श्रद्धा सोसाइटी, जेठवा नगर ,एस.वी.रोड, आस्था हॉस्पिटल समोर, कांदिवली स्टेशन रोड, कांदिवली पश्चिम, मुंबई -४०००६७
वेब : dromkar-pt.strikingly.com
ट्वीटर पेज : https://twitter.com/Dromkarpadhye
No comments:
Post a Comment